Bnss कलम ३६२ : चौकशी सुरू झाल्यावर खटला कमिट (सुपुर्द) करावा असे न्यायाधीशांना आढळून येते तेव्हाची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३६२ :
चौकशी सुरू झाल्यावर खटला कमिट (सुपुर्द) करावा असे न्यायाधीशांना आढळून येते तेव्हाची प्रक्रिया :
जर दंडाधिकाऱ्यासमोरील कोणत्याही अपराध-चौकशीत किंवा संपरीक्षेत, न्यायनिर्णय स्वाक्षरित करण्यापूर्वी कार्यवाही कोणत्याही टप्प्यात असताना, दंडाधिकाऱ्याला सत्र न्यायालयाने ज्याची संपरीक्षा कारावयाला हवी असा तो खटला आहे असे दिसून आले तर, तो यात यापूर्वी अंतर्भूत असलेल्या उपबंधांखाली त्या न्यायालयाकडे तो खटला सुपूर्द करील आणि त्यानंतर १९ व्या प्रकरणाचे उपबंध अशा रीतीने केलेल्या सुपूर्दगीला लागू होतील.

Leave a Reply