Bnss कलम ३६१ : दंडाधिकारी निकालात काढू शकणार नाही अशा खटल्यामधील प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३६१ :
दंडाधिकारी निकालात काढू शकणार नाही अशा खटल्यामधील प्रक्रिया :
१) जर कोणत्याही जिल्ह्यातील दंडाधिकाऱ्यासमोर होणाऱ्या कोणत्याही अपराध चौकशीच्या किंवा संपरीक्षेच्या ओघात पुराव्यावरून त्या दंडाधिकाऱ्याला-
(a) क) (अ) त्या खटल्याची संपरीक्षा करण्याची किंवा तो संपरीक्षेसाठी सुपूर्द करण्याची आपणास अधिकारिता नाही, किंवा
(b) ख) (ब) तो खटला जिल्ह्यातील अन्य कोणत्याही दंडाधिकाऱ्याने ज्याची संपरीक्षा करावी किंवा संपरीक्षेसाठी सुपूर्द करावा अशा प्रकारचा आहे, किंवा
(c) ग) (क) त्या खटल्याची संपरीक्षा मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याने करणे योग्य आहे, असे गृहीत धरणे समर्थनीय वाटले तर, तो कार्यवाही तहकूब करील व तो खटला, त्याचे स्वरूप स्पष्ट करणाऱ्या संक्षिप्त अहवालासह, मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याकडे किंवा मुख्य न्याय दंडाधिकारी निदेशित करील अशा अधिकारिता असलेल्या अन्य दंडाधिकाऱ्याकडे सादर करील.
२) ज्याच्याकडे खटला सादर केलेला असेल त्या दंडाधिकाऱ्याला तसा अधिकार प्रदान झालेला असल्यास, तो स्वत:च्या खटल्याची संपरीक्षा करू शकेल किंवा आपणास दुय्यम असलेल्या ज्या दंडाधिकाऱ्याला अधिकारिता असेल अशा कोणत्याही दंडाधिकाऱ्याकडे तो निर्देशित करू शकेल किंवा आरोपीला संपरीक्षा होईपावेतो हवालतीत ठेवू शकेल.

Leave a Reply