भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३४३ :
सह अपराधीला माफी देऊ करणे :
१) हे कलम ज्यास लागू होते अशा अपराधात प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे निबध्द किंवा सहभागी असल्याचे समजण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा साक्षीपुरावा मिळवण्याच्या हेतूने, अशा व्यक्तीला मुख्य न्यायदंडाधिकारी अपराधाचे अन्वेषण किंवा चौकशी किंवा संपरीक्षा कोणत्याही टप्प्यात असताना आणि त्या अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा करणारा प्रथम वर्ग दंडाधिकारी, चौकशी किंवा संपरीक्षा कोणत्याही टप्प्यात असताना, अपराधासंबंधीची आणि तो करण्याच्या कामी म्होरक्या म्हणून किंवा अपप्रेरक म्हणून संबंधित अशा प्रत्येक इसमासंबंधीची तिला माहीत असलेली सर्व परिस्थिती संपूर्णपणे व खरेपणाने उघड करण्याच्या शर्तीवर माफी देऊ शकेल.
२) हे कलम,
(a) क) (अ) सत्र न्यायालयानेच केवळ किंवा त्या त्याकाळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याखाली नियुक्त केलेल्या विशेष न्यायाधीशाच्या न्यायालयाने संपरीक्षा करण्याजोग्या कोणत्याही अपराधास; किंवा
(b) ख) (ब) सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या कारावासाच्या शिक्षेस किंवा त्याहून अधिक कडक शिक्षेस पात्र असलेल्या कोणत्याही अपराधास, लागू आहे.
३) पोटकलम (१)खाली माफी देऊ करणारा प्रत्येक दंडाधिकारी,
(a) क) (अ) तसे करण्याची आपली कारणे;
(b) ख) (ब) ज्या व्यक्तीला माफी देऊ करण्यात आली तिने ती स्वीकारली किंवा नाही याची नोंद करील आणि आरोपीने केलेल्या अर्जावरून त्याला अशा नोंदीची प्रत विनामूल्य पुरवील.
४) पोटकलम (१)खाली देऊ केलेली माफी स्वीकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला-
(a) क) (अ) अपराधाची दखल घेणाऱ्या दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात आणि मागाहून कोणतीही संपरीक्षा झाल्यास त्या संपरीक्षेत, साक्षीदार म्हणून तपासले जाईल;
(b) ख) (ब) तिला आधीच जामीन देण्यात आला नसेल तर, संपरीक्षा संपेपर्यंत हवालतीत स्थानबध्द केले जाईल.
५) जेथे पोटकलम (१)खाली देऊ केलेली माफी एखाद्या व्यक्तीने स्वीकारली असेल आणि पोटकलम (४)खाली तिची साक्षतपासणी करण्यात आली असेल तर, अपराधाची दखल घेणारा दंडाधिकारी, त्या खटल्याची पुढील चौकशी न करता,
(a) क) (अ) एक) केवळ सत्र न्यायालयानेच संपरीक्षा करण्याजोगा तो अपराध असेल तर किंवा दखल घेणारा दंडाधिकारी हा मुख्य न्यायदंडाधिकारी असेल तर, सत्र न्यायालयाकडे;
दोन) त्या त्याकाळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याखाली नियुक्त केलेल्या विशेष न्यायाधीशाच्या न्यायालयानेच संपरीक्षा करण्याजोगा तो अपराध असेल तर, त्या न्यायालयाकडे संपरीक्षेसाठी सुपूर्द करील;
(b) ख) (ब) अन्य कोणत्याही बाबतीत, तो खटला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्याकडे वर्ग करील व तो मुख्य न्याय दंडाधिकारी स्वत:खटल्याची संपरीक्षा करील.