Bnss कलम ३१३ : अशी साक्ष पुर्ण होईल तेव्हा त्याबाबत करावयाची प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३१३ :
अशी साक्ष पुर्ण होईल तेव्हा त्याबाबत करावयाची प्रक्रिया :
१) कलम ३१० किंवा कलम ३११ खाली घेतलेली प्रत्येक साक्षीदाराची साक्ष पूर्ण होईल तेव्हा, आरोपी समक्ष हजर असेल तर, त्याच्या किंवा तो वकिलामार्फ त उपस्थित असेल तर वकिलाच्या समक्ष साक्षीदाराला ती वाचून दाखविण्यात येईल व जरून तर तीत दुरूस्ती केली जाईल.
२) साक्षीदाराला साक्ष वाचून दाखवण्यात येईल तेव्हा, त्याने तिचा एखादा भाग बरोबर असल्याचे नाकारले तर, दंडाधिकारी किंवा पीठासीन न्यायाधीश साक्षीत दुरूस्ती करण्याऐवजी, त्या साक्षीवर साक्षीदाराने घेतलेल्या आक्षेपाचे टिप्पण करू शकेल व आपणांस जरूरीचे वाटतील असे शेरे जोडील.
३) जर साक्ष ज्या भाषेत देण्यात आली तीहून निराळ्या भाषेत तिचा अभिलेख करण्यात आला असेल व साक्षीदाराला ती भाषा समजत नसेल तर, ज्या भाषेत साक्ष दिली होती त्या भाषेत किंवा जे भाषा त्याला समजते त्या भाषेत तो अभिलेख त्याला भाषांतर करून सांगितला जाईल.

Leave a Reply