Bnss कलम ३१० : वॉरंट खटल्यामधील अभिलेख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३१० :
वॉरंट खटल्यामधील अभिलेख :
१) दंडाधिकाऱ्यापुढे संपरीक्षा केल्या जाणाऱ्या सर्व वॉरंट-खटल्यांमध्ये प्रत्येक साक्षीदाराची जसजशी साक्ष तपासणी होत जाईल तसतशी त्याची साक्ष दंडाधिकारी स्वत: अथवा खुल्या न्यायालयात तोंडी मजकूर सांगून अथवा शारीरिक किंवा अन्य प्रकारच्या अक्षमतेमुळे तो तसे करण्यास असमर्थ असेल तर, त्याच्या निदेशनानुसार व देखरेखीखाली, त्याने या संबंधात नियुक्त केलेला अधिकारी लेखी उतरवून घेत जाईल.
परंतू, या पोटकलमाखालील साक्षीदारांचा साक्षपुरावा अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीच्या वकिलाच्या उपस्थितीत दृक-श्राव्य इलेक्ट्रॉनिक साधनांच्या द्वारे देखील नोंदविण्यात येईल.
२) जेव्हा दंडाधिकारी साक्ष उतरून घेण्याची तजवीज करील तेव्हा, तो पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कारणांस्तव आपण स्वत:साक्ष उतरवून घेऊ शकलो नाही असे प्रमाणपत्र नमूद करील.
३) अशी साक्ष सर्वसामान्यपणे हकीकतीच्या रूपात उतरवून घेतली जाईल; पण दंडाधिकाऱ्याला स्वविवेकानुसार अशा साक्षीचा कोणताही भाग प्रश्नोत्तराच्या रूपात उतरून घेता येईल किंवा घेण्याची तजवीज करता येईल.
४) या प्रमाणे उतरून घेतलेल्या साक्षीवर दंडाधिकारी स्वाक्षरी करील व ती अभिलेखाचा भाग होईल.

Leave a Reply