भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २९९ :
आरोपीच्या निवेदनांचा वापर करावयाचा नाही :
त्या- त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यात काहीही समाविष्ट असले तरीही, आरोपीने कलम २९० खाली सौदा करण्यासाठीच्या विनंतीच्या अर्जांमध्ये नमूद केलेल्या निवेदनाचा किंवा वस्तुस्थितीचा या प्रकरणाच्या प्रयोजनाखेरीज इतर कोणत्याही प्रयोजनासाठी वापर करण्यात येणार नाही.
