भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २९७ :
आरोपीने पूर्ण केलेला स्थानबध्दतेचा कालावधी कारावासाच्या शिक्षेमधून निर्लेखित करणे :
या प्रकरणान्वये लादलेल्या कारावासाच्या शिक्षेमधून आरोपीने भोगलेला स्थानबध्दतेचा कालावधी निर्लेखिल करताना, या संहितेच्या इतर तरतुदींखालील कारावासाच्या संबंधात कलम ४६८ च्या तरतुदी ज्या रीतीने लागू होतात त्याच रीतीने त्या लागू होतील.