भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २९२ :
परस्पर संमतीने निकालात काढण्यासंबंधीचा अहवाल न्यायालयाकडे सादर करावयाचा :
कलम २९१ खालील बैठकीत प्रकरण समाधानकारकपणे निकालात काढण्यासंबंधीचे तपशील तयार करण्यात आले तर, न्यायालय अशा निकालात काढण्यासंबंधीचा अहवाल इतर सर्व व्यक्ती त्यावर सही करतील आणि जर असे प्रकरण निकालात काढण्याचे कोणतेही तपशील ठरविण्यात आले नसतील तर न्यायालय तसा अभिप्राय नमूद करील आणि अशा प्रकरणात कलम २९०, पोटकलम (१) अन्वये ज्या टप्प्यावर अर्ज करण्यात आला असेल त्या टप्प्यापासून या संहितेच्या तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करील.
