भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २४९ :
फिर्यादी पक्षातर्फे प्रारंभिक कथन करणे :
कलम २३२ खाली किंवा त्या त्याकाळी अमलात असलेल्या अन्य कायद्याखाली खटला सुपूर्द करण्यात आल्यावरून जेव्हा आरोपी न्यायालयासमोर उपस्थित होईल किंवा आणला जाईल तेव्हा, फिर्यादी हा आरोपीविरूध्द आणलेल्या दोषारोपाचे वर्णन करून आणि कोणत्या पुराव्याने त्याने आरोपीचा दोष शाबीत करण्याचे योजिले आहे ते निवेदन करून आपल्या बाजूचे प्रारंभिक कथन करील.
