भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५१६ :
विवक्षित प्रसंगी अवधी वगळणे :
१) मूदतमर्यादेची गणना करताना, ज्या अवधीत कोणतीही व्यक्ती यथायोग्य तत्परतेने अपराध्याविरूद्ध अन्य खटला चालवीत असेल- मग तो प्रारंभिक न्यायालयात असो वा अपिलाच्या किंवा पुनरीक्षणाच्या न्यायालयात असो-तो अवधी वगळण्यात येईल:
परंतु, तो खटला त्याच तथ्यांशी संबंधित असून जे न्यायालय अधिकारतेतील उणिवेमुळे किंवा तशाच स्वरूपाच्या अन्य कारणामुळे तो खटला विचारार्थ स्वीकारण्यास असमर्थ आहे त्या न्यायालयात तो सद्भवनार्पूक चालवला असल्याशिवाय असा कोणताही अवधी वगळला जाणार नाही.
२) जेव्हा एखाद्या अपराधाबाबत खटला दाखल करण्याचे व्यादेशाद्वारे किंवा आदेशाद्वारे स्थगित करण्याच आले असेल तेव्हा, मुदतमर्यादेची गणना करताना, व्यादेश किंवा आदेश चालू राहिल्याचा कालावधी आणि ज्या दिवशी तो व्यादेश किंवा आदेश काढला किंवा दिला व ज्या दिवशी तो मागे घेतला तो वगळला जाईल.
३) जेव्हा एखाद्या अपराधाबद्दल खटल्याची नोटीस देण्यात आली असेल अथवा अपराधाबद्दल कोणताही खटला सुरू करण्यासाठी त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याखाली शासनाची किंवा कोणत्याही प्राधिकरणाची पूर्वसंमती किंवा मंजुरी आवश्यक असेल तेव्हा, मुदतमर्यादेची गणना करताना, अशा नोटिशीचा कालावधी अथवा, प्रकरणपरत्वे, अशी संमती किंवा मंजुरी मिळवण्यासाठी लागणारा अवधी वगळला जाईल.
स्पष्टीकरण :
शासनाची किंवा अन्य कोणत्याही प्राधिकरणाची संमती किंवा मंजुरी मिळवण्यासाठी लागणाऱ्या अवधीची गणना करताना, संमती किंवा मंजुरी मिळवण्यासाठी ज्या दिनांकास अर्ज केलेला असेल तो व शासनाचा किंवा अन्य प्राधिकरणाचा आदेश मिळाल्याचा दिनांक हे दोन्ही वगळले जातील.
४) मुदतमर्यादेची गणना करताना, ज्या अवधीत अपराधी –
(a) क) (अ) भारताबाहेर असेल किंवा भारताबाहेरील जे कोणतेही क्षेत्र केंद्र शासनाच्या प्रशासनाखाली आहे त्याबाहेर असेल, किंवा
(b) ख) (ब) फरारी होऊन किंवा गुप्त राहून त्याने अटक चुकवली असेल, तो अवधी वगळला जाईल.