Bnss कलम ४७ : अटक केलेल्या व्यक्तिला अटकेची कारणे सांगणे, जामीन हक्क माहिती देणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४७ :
अटक केलेल्या व्यक्तिला अटकेची कारणे सांगणे, जामीन हक्क माहिती देणे :
१) वॉरंटाशिवाय कोणत्याही व्यक्तीला अटक करणारा प्रत्येक पोलीस अधिकारी किंवा अन्य व्यक्ती, ज्याबद्दल तिला अटक केलेली असेल, त्या अपराधाचा संपूर्ण तपशील किंवा अशा अटकेची अन्य कारणे तिला तत्काळ कळवील.
२) जेव्हा पोलीस अधिकारी बिनजामिनी अपराधाचा आरोप असलेल्या व्यक्तीहून अन्य व्यक्तीला वॉरंटाशिवाय अटक करील तेव्हा, तो अटक केलेल्या व्यक्तीला, जामिनावर सुटका होण्यास ती हक्कदार आहे व तिला स्वत:च्या वतीने जामीनदारांची व्यवस्था करता येईल असे कळवील.

Leave a Reply