Bnss कलम ४२९ : उच्च न्यायालयाने अपिलान्ती दिलेला आदेश कनिष्ठ न्यायालयाकडे प्रमाणित करून पाठविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४२९ :
उच्च न्यायालयाने अपिलान्ती दिलेला आदेश कनिष्ठ न्यायालयाकडे प्रमाणित करून पाठविणे :
१) जेव्हा केव्हा उच्च न्यायालयाने या प्रकरणाखाली एखाद्या खटल्याचा अपिलान्ती निर्णय केला असेल तेव्हा, ज्याविरूध्द अपील केले असेल तो निष्कर्ष, शिक्षादेश किंवा आदेश ज्या न्यायलयाने लिहिला किंवा दिला होता त्या न्यायालयाकडे ते आपला न्यायनिर्णय किंवा आदेश प्रमाणित करून पाठवील व जर असे न्यायालय हे मुख्य न्याय दंडधिकाऱ्याहून अन्य न्याय दंडाधिकाऱ्याचे न्यायालय असेल तर, उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय किंवा आदेश मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यामार्फ त पाठवला जाईल; व जर असे न्यायालय हे कार्यकारी दंडाधिाकऱ्याचे न्यायालय असेल तर, उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय किंवा आदेश जिल्हा दंडाधिाकऱ्यामार्फ त पाठवला जाईल.
२) ज्या न्यायालयाकडे उच्च न्यायालय आपला न्यायनिर्णय किंवा आदेश प्रमाणित करून पाठवील ते त्यावरून उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयाला किंवा आदेशाला अनुरूप असणारे असे आदेश देईल; व जरूर तर, अभिलेख त्यानुसार विशोधित केला जाईल.

Leave a Reply