भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४१४ :
शांतता राखण्यासाठी किंवा चांगले वर्तन ठेवण्यासाठी जामीन आवश्यक करणाऱ्या किंवा त्याबद्दल जामीनदार स्वीकारण्यास नकार देणाऱ्या किंवा तो नाकारणाऱ्या आदेशांवर अपील (चॅपटर केसेस) :
एक) ज्या व्यक्तीला शांतता राखण्यासाठी किंवा चांगले वर्तन ठेवण्यासाठी जामीन देण्याचा कलम १३६ खाली आदेश देण्यात आला असेल, किंवा
दोन) जी व्यक्ती कलम १४० खाली जामीनदार स्वीकारण्यास नकार देणाऱ्या किंवा तो नाकारणाऱ्या आदेशामुळे नाराज झाली असेल,
अशी कोणतीही व्यक्ती सत्र न्यायालयाकडे अशा आदेशाविरूध्द अपील करू शकेल.
परंतु, कलम १४१ च्या पोटकलम (२) किंवा पोटकलम (४) च्या उपबंधांनुसार ज्यांच्याविरूध्दची कार्यवाही सत्र न्यायाधीशापुढे मांडण्यात आली असेल अशा व्यक्तींना या कलमातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही.