भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४०९ :
शिक्षादेश कायम करण्याचा किंवा दोषसिद्धी रद्दबातल करण्याचा अधिकार :
कलम ४०७ खाली सादर करण्यात आलेल्या कोणत्याही खटल्यात उच्च न्यायालय-
(a) क) (अ) शिक्षादेश कायम करु शकेल, किंवा कायद्याने प्राधिकृत केलेला अन्य कोणताही शिक्षादेश देऊ शकेल, किंवा
(b) ख) (ब) दोषसिद्धी रद्दबातल करु शकेल, आणि सत्र न्यायालय आरोपीला ज्या कोणत्याही अपराधाबद्दल सिद्धदोष ठरवू शकले असते अशा कोणत्याही अपराधाबद्दल त्याला सिद्धदोष ठरवू शकेल अथवा त्याच किंवा सुधारित दोषारोपावरुन नव्याने संपरिक्षा करण्याचा आदेश देऊ शकेल, किंवा
(c) ग) (क) आरोपी व्यक्तीला दोषमुक्त करु शकेल :
परंतु, अपील दाखल करण्यासाठी देण्यात आलेला अवधी संपेपर्यंत किंवा अशा अवधीत अपील सादर केले असेल तर अशा अपिलाचा निकाल होईपर्यंत, या कलमाखाली शिक्षादेश कायम करण्याचा आदेश दिला जाणार नाही.