भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४०२ :
विवक्षित प्रकरणात विशेष कारणांची नोंद करणे :
जेव्हा न्यायालय-
(a) क) (अ) कलम ४०१ खाली किंवा अपराधी परिवीक्षा अधिनियम १९५८ (१९५८ चा २०) याच्या उपबंधांखाली आरोपी व्यक्तीसंबंधी, किंवा
(b) ख) (ब) बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ (२०१६ चा २) अथवा किशोरवयीन अपराध्यांवर उपचार, त्यांचे प्रशिक्षण किंवा पुनर्वसन यासाठी त्या त्या काळी अमलात असलेल्या अन्या कोणत्याही कायद्याखाली एखाद्या किशोरवयीन अपराध्यासंबंधी, कार्यवाही करू शकले असते,
पण त्याने तसे केलेले नसेल तेव्हा, तसे न केल्याची विशेष कारणे ते आपल्या न्यायनिर्णयात नमूद करील.