Bnss कलम ३९५ : भरपाई देण्याचा आदेश :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३९५ :
भरपाई देण्याचा आदेश :
१) जेव्हा न्यायालय द्रव्यदंडाची शिक्षा किंवा द्रव्यदंड ज्याचा भाग द्रव्यदंड ज्याचा भाग आहे अशी शिक्षा (मृत्यूची शिक्षा धरून) देईल तेव्हा, न्यायनिर्णय देताना न्यायालय वसूल केलेला संपूर्ण द्रव्यदंड किंवा त्याचा कोणताही अंश पुढील कारणांसाठी उपयोजित करण्याचा आदेश देऊ शकेल, ते असे:
(a) क) (अ) खटल्याच्या कामी योग्य रीतीने झालेला खर्च भागवण्यासाठी;
(b) ख) (ब) अपराधामुळे झालेल्या कोणत्याही हानीबद्दल किंवा क्षतीबद्दल एखाद्या व्यक्तीला न्यायालयाच्या मते, दिवाणी न्यायालयात भरपाई वसूल करता येण्याजोगी असेल तेव्हा, अशा व्यक्तीला भरपाई वसूल करता येण्याजोगी असेल तेव्हा, अशा व्यक्तील भरपाई देण्यासाठी;
(c) ग) (क) एखाद्या व्यक्तीला अन्य व्यक्तीचा मृत्यू घडवून आणल्यामुळे एखाद्या अपराधाबद्दल किंवा असा अपराध करण्यास अपप्रेरणा दिल्याबद्दल सिध्ददोष ठरवण्यात आले असेल तेव्हा, ज्या व्यक्ती अशा मृत्यूमुळे त्यांना पोचलेल्या हानीबद्दल शिक्षा देण्यात आलेल्या व्यक्तीकडून प्राणांतिक अपघात अधिनियम, १८५५ (१८५५ चा १३) याखाली वसूल करण्यास हक्कदार असतील त्यांना भरपाई देण्यासाठी;
(d) घ) (ड) चोरी, फौजदारीपात्र अपहार, फौजदारीपात्र न्यासभंग, अथवा ठकवणूक अथवा एखादी मालमत्ता चोरीची असल्याचे माहीत असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना ती चोरीची मालमत्ता अप्रामाणिकपणे स्वीकारणे किंवा ठेवून घेणे किंवा तिची विल्हेवाट करण्याच्या कामी स्वेच्छापूर्वक साहय करणे हे ज्यात समाविष्ट आहे अशा कोणत्याही अपराधाबद्दल जेव्हा कोणत्याही व्यक्तीला सिध्ददोष ठरवण्यात आले असेल तेव्हा, अशी मालमत्ता तिला हक्कदार असणाऱ्या व्यक्तीच्या कब्जात परत दिल्यास अशा मालमत्तेच्या सभ्दावपूर्ण खरेदीदारास ती गमावावी लागल्याबद्दल त्याला भरपाई देण्यासाठी.
२) जर अपिलास पात्र असलेल्या एखाद्या खटल्यात द्रव्यदंड बसवण्यास आला असेल तर,अपील सादर करण्याकरता देण्यात आलेला अवधी लोटण्यापूर्वी किंवा, अपील सादर केले असेल तर अपिलाच्या निर्णयापूर्वी, असा कोणताही भरणा केला जाणार नाही.
३) द्रव्यदंड हा जिचा भाग नाही अशी शिक्षा जेव्हा न्यायालयाने ठोठावली असेल तेव्हा, न्यायनिर्णय देताना न्यायालय आरोपी व्यक्तीला ज्या कृत्याबद्दल याप्रमाणे शिक्षादेश देण्यात आला असेल त्या कृत्यामुळे ज्या व्यक्तीला कोणतीही हानी किंवा क्षती पोचली असेल त्या व्यक्तीला आदेशात विनिर्दिष्ट केली जाईल अशी रक्कम भरपाईदाखल आरोपी व्यक्तीने द्यावी असा आदेश देऊ शकेल.
४) या कलमाखालील आदेश अपील न्यायालय किंवा आपले पुनरीक्षणाचे अधिकार वापरणारे उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय काढू शकेल.
५) त्याच बाबींशी संबंधित असलेल्या नंतरच्या कोणत्याही दिवाणी दाव्यात भरपाई देववताना या कलमाखाली भरपाई म्हणून दिलेली किंवा वसूल केलेली कोणतीही रक्कम न्यायालय विचारात घेईल.

Leave a Reply