Bnss कलम ३८६ : निबंधक अगर उप-निबंधक यांना केव्हा दिवाणी न्यायालय मानावयाचे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३८६ :
निबंधक अगर उप-निबंधक यांना केव्हा दिवाणी न्यायालय मानावयाचे :
राज्य शासन तसे निदेशित करील तेव्हा, नोंदणी अधिनियम, १९०८ (१९०८ चा १६) याखाली नियुक्त केलेला कोणताही निबंधक किंवा दुय्यमनिबंधक हा ३८४ व ३८५ या कलमांच्या अर्थानुसार दिवाणी न्यायालय असल्याचे मानले जाईल.

Leave a Reply