भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३७३ :
मनोविकलतेच्या कारणावरून दोषमुक्तीचा न्यायनिर्णय :
कोणत्याही व्यक्तीने ज्या वेळी अपराध केल्याचे अभिकथन करण्यात आले असेल त्या वेळी ती ज्या कृत्याने अपराध घडला असल्याचे अभिकथन झाले असेल त्याचे स्वरूप काय आहे अथवा ते कृत्य गैर किंवा कायद्याच्या विरोधी आहे हे जाणण्यास मनोविकलतेमुळे अक्षम होती या कारणावरून त्या व्यक्तीस दोषमुक्त करण्यात येईल तेव्हा, त्याने ते कृत्य केले किंवा नाही याबाबतचा निष्कर्ष स्पष्टपणे नमूद केला जाईल.