भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ५ :
व्यक्तींना अटक करणे :
कलम ३५ :
पोलीस वॉरंटाशिवाय केव्हा अटक करू शकतात :
१)कोणताही पोलीस अधिकारी-
(a) क) (अ) जी व्यक्ती, कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत, एखादा दखलपात्र अपराध करील अशा व्यक्तीस;
(b) ख) (ब) ज्या व्यक्तीने सात वर्षांपेक्षा कमी नसेल किंवा सात वर्षांपर्यंत असू शकेल अशा मुदतीच्या कारावसाच्या शिक्षेस मग ती द्रव्यदंडासह असो किंवा त्याशिवाय असो -पात्र असेल असा दखलपात्र अपराध केला आहे अशी वाजवी तक्रार ज्या व्यक्तीच्याविरूध्द करण्यात आली असेल, किंवा तशी विश्वसनीय माहिती मिळाली असेल किंवा तसा वाजवी संशय असेल अशा व्यक्तीस, जर ;पुढील शर्तीची पूर्तता होत असेल, तर :-
एक) अशा व्यक्तीने उक्त अपराध केला आहे असे अशा तक्रारीच्या माहितीच्या किंवा संशयाच्या आधारे विश्वास ठेवण्यास पोलीस अधिकाऱ्यास कारण असेल;
दोन) (a)क) (अ) अशा व्यक्तीस आणखी कोणताही अपराध करण्यापासून, अशा व्यक्तीस प्रतिबंध करण्यासाठी किंवा
(b) ख) (ब) अपराधाचे योग्य प्रकारे अन्वेषण करण्यासाठी किंवा
(c) ग) (क) अपराधाचा पुरावा नाहीसा करण्यापासून किंवा कोणत्याही रीतीने अशा पुराव्यामध्ये फेरफार करण्यापासून अशा व्यक्तीस प्रतिबंध करण्यासाठी किंवा
(d) घ) (ड) ज्या व्यक्तीस प्रकरणाची वस्तूस्थिती माहीत आहे अशा व्यक्तीस, अशी वस्तुस्थिती न्यायालयाकडे किंवा पोलीस अधिकाऱ्याकडे उघड करण्यापासून परावृत्त दृश्य व स्पष्ट ओळख धारण करील;
(e) ङ) (इ) अशा व्यक्तीस अटक केली नाही तर, जेव्हा जेव्हा आवश्यक असेल तेव्हा, न्यायालयामध्ये ती उपस्थित राहील याची खात्री असू शकणार नाही;
म्हणून अशी अटक करणे आवश्यक आहे याबाबत पोलीस अधिकाऱ्याची खात्री पटली असेल तर त्यासाठी आणि पोलीस अधिकारी अशी अटक करतेवेळी, त्याची कारणे लेखी नोंदवील :
परंतु या पोटकलमान्वये एखाद्या व्यक्तीस अटक करणे आवश्यक नसेल तर, अशा सर्व प्रकरणांमध्ये, पोलीस अधिकारी अटक न करण्याची कारणे लेखी नमूद करील.
(c) ग) (क) एखाद्या व्यक्तीने, सात वर्षापेक्षा अधिक असेल इतक्या मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस-मग ती द्रव्यदंडासह असो किंवा नसो, किंवा मृत्युदंडाच्या शिक्षेस पात्र असेल असा दखलपात्र अपराध केला आहे अशी विश्वसनीय माहिती त्या व्यक्तीच्या बाबत मिळालेली असेल आणि अशा व्यक्तीने उक्त अपराध केला आहे असे अशा माहितीच्या आधारे, विश्वास ठेवण्यास पोलीस अधिकाऱ्यास कारण असेल तर;
(d) घ) (ड) ज्या व्यक्तीला या संहितेखाली किंवा राज्य शासनाच्या आदेशाद्वारे अपराधी म्हणून उद्घोषित करण्यात आले आहे; किंवा
(e) ङ) (इ) चोरीची मालमत्ता म्हणून वाजवी संशय घेता येईल अशी कोणतीह वस्तू जिच्या कब्जात असून अशा वस्तूसंबंधात ज्या व्यक्तीने अपराध केला असल्याचा वाजवी संशय घेता येईल; किंवा
(f) च) (फ) पोलीस अधिकारी आपले कर्तव्य बजावीत असताना जी व्यक्ती त्याला अडथळा आणते, अथवा जी व्यक्ती कायदेशीर हवालतीतून निसटली आहे किंवा निसटण्याचा प्रयत्न करते; किंवा
(g) छ) (ग) जी व्यक्ती संघराज्याच्या सशस्त्र सेनादलांपैकी कोणत्याही सेनादलातून पळून आली असल्याचा वाजवी संशय आहे; किंवा
(h) ज) (ह) भारताबाहेर कोणत्याही स्थळी केलेली जी कोणतीही कृती भारतात केली असती तर अपराध म्हणून शिक्षापात्र झाली असती तिच्याशी जी व्यक्ती संबंधित असून अथवा त्या कृतीशी संबंधित असल्याबद्दल जिच्याविरूद्ध वाजवी फिर्याद देण्यात आली असून किंवा तसा वाजवी संशय असून त्याबद्दल प्रत्यर्पणाशी संबंधित अशा कोणत्याही कायद्याखाली किंवा अन्यथा भारतात गिरफदार केली जाण्यास किंवा हवालतीत स्थानबद्ध केली जाण्यास पात्र आहे; किंवा
(i) झ) (आय) जी व्यक्ती बंधमुक्त सिद्धदोषी असून, कलम ३५६ च्या पोटकलम (५) खाली केलेल्या कोणत्याही नियमाचा भंग करते; किंवा
(j) ञ) (जे) ज्या व्यक्तीच्या अटकेसाठी, अन्य पोलीस अधिकाऱ्याकडून कोणतीही रीतसर मागणी मग ती लेखी किंवा तोंडी असो आलेली असून अटक करायची व्यक्ती आणि ज्याबद्दल अटक करायची तो अपराध किंवा अन्य कारण रीतसर मागणीपत्रात विनिर्दिष्ट केलेले असेल आणि ज्याने ती रीतसर मागणी केली तो अधिकारी कायद्याने वॉरंटशिवाय त्या व्यक्तीला अटक करू शकला असला असे त्यावरून दिसून आले तर,
अशा कोणत्याही व्यक्तीस, दंडाधिकाऱ्याकडून आदेश मिळाल्याशिवाय व वॉरंटशिवाय अटक करू शकेल.
२) कलम ३९ च्या तरतुदीस अधीन राहून, जी व्यक्ती एखाद्या अदखलपात्र अपराधाशी संबंधित आहे किंवा ती कोणत्या प्रकारच्या अपराधाशी संबंधित आहे किंवा ती एखाद्या अपराधाशी संबंधित असल्याबाबत ज्या व्यक्तीविरूद्ध तक्रार करण्यात आली आहे किंवा तशी विश्वसनीय माहिती मिळालेली आहे किंवा तसा वाजवी संशय आहे अशा कोणत्याही व्यक्तीस, वॉरंटशिवाय किंवा दंडाधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय अटक करता येणार नाही.
३) पोलीस अधिकारी पोटकलम (१) च्या तरतुदीन्वये जेव्हा एखाद्या व्यक्तीस अटक करण्याची आवश्यकता नेसल अशा सर्व प्रकरणी, एखाद्या व्यक्तीने एखादा दखलपात्र अपराध केला आहे अशी वाजवी तक्रार ज्या व्यक्तीविरूद्ध करण्यात आली असेल किंवा तशी विश्वसनीय माहिती मिळाली असेल किंवा तसा वाजवी संशय असेल अशा व्यक्तीस, त्याच्यासमोर किंवा नोटिशीमध्ये विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा अन्य ठिकाणी (उपस्थित राहण्यासाठी) अशा व्यक्तीस निदेश देणारी नोटीस काढील.
४) जेव्हा अशी नोटीस, कोणत्याही व्यक्तीस देण्यात आल असेल तेव्हा अशा नोटिशीच्या अटींचे पालन करणे हे त्या व्यक्तीचे कर्तव्य असेल.
५) जेव्हा अशा व्यक्तीने नोटिशीचे पालन केले असेल किंवा पालन करण्याचे चालू ठेवले असेल तेव्हा, अशा व्यक्तीस अटक केली पाहिजे असे पोलीस अधिकाऱ्याचे मत असल्याबाबतची कारणे नोंदविल्याशिवाय, नोटिशीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या अपराधाच्या बाबतीत अशा व्यक्तीस अटक करता येणार नाही.
६) जेव्हा अशी व्यक्ती कोणत्याही वेळी, नोटिशीच्या अटीचे पालन करण्यात निष्फळ ठरली असेल किंवा अपाली ओळख पटवून देण्यास तयार होत नसेल तेव्हा पोलीस अधिकारी सक्षम न्यायालयाकडून याबाबतीत संबत करण्यात येतील अशा आदेशांस अधीन राहून, नोटिशीत नमूद केलेल्या गुन्हासाठी अशा व्यक्तीस अटक करू शकेल.
७) कोणतीही अटक, तीन वर्षापेक्षा कमी कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या किंवा साठ वर्षापेक्षा जास्त वय असेल, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या खाली नसलेल्या अधिकाऱ्याची पूर्वपरवानगीशिवाय केली जाणार नाही.