Bnss कलम ३५८ : अपराधाचे दोषी दिसून येत असलेल्या अन्य व्यक्तीं विरुद्ध कार्यवाही करण्याची शक्ति :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३५८ :
अपराधाचे दोषी दिसून येत असलेल्या अन्य व्यक्तीं विरुद्ध कार्यवाही करण्याची शक्ति :
१) अपराधाच्या चौकशीच्या किंवा संपरीक्षेच्या ओघात जेव्हा, आरोपी नसलेल्या एखाद्या व्यक्तीने एखादा अपराध केला असून त्याबद्दल अशा व्यक्तीची आरोपीबरोबर संपरीक्षा केली जाऊ शकेल असे पुराव्यावरून दिसून येईल तेव्हा, न्यायालयाला अशा व्यक्तीने जी अपराध केला असल्याचे दिसत असेल त्याबद्दल तिच्याविरूध्द कार्यवाही करता येईल.
२) जेव्हा अशी व्यक्ती न्यायालयात समक्ष हजर नसेल तेव्हा, उपरोक्त प्रयोजनासाठी प्रकरणाच्या परिस्थितीनुसार जरूरी पडेल त्याप्रमाणे, तिला अटक केली जाऊ शकेल किंवा समन्स काढले जाऊ शकेल.
३) न्यायालयात हजर राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीला अटक केलेली नसली किंवा समन्स काढलेले नसले तरी, तिने जो अपराध केला असल्याचे दिसत असेल त्यांची चौकशी किंवा संपरीक्षा करण्याच्या प्रयोजनासाठी असे न्यायालय तिला अडकवून ठेवू शकेल.
४) पोटकलम (१) खाली न्यायालय कोणत्याही व्यक्तीविरूध्द कार्यवाही करील तेव्हा,-
(a) क) (अ) अशा व्यक्तीबाबतची कार्यवाही नव्याने सुरू केली जाईल व साक्षीदारांची फेरसुनावणी करण्यात येईल;
(b) ख) (ब) खंड (a)(क) (अ) च्या उपबंधांच्या अधीनतेने, ज्या अपराधाबाबत चौकशी किंवा संपरीक्षा सुरू झाली होती त्याची न्यायालयाने दखल घेतली त्या वेळी जणू काही अशी व्यक्ती आरोपी व्यक्ती असावी त्याप्रमाणे तो खटला पुढे चालू होईल.

Leave a Reply