भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३५० :
फिर्यादी व साक्षीदारांचा खर्च :
राज्य शासनाने केलेल्या कोणत्याही नियमांच्या अधीनतेने, कोणतेही फौजदारी न्यायालय, त्याला योग्य वाटल्यास अशा न्यायालयासमोरील या संहितेखालील कोणत्याही चौकशीच्या, संपरीक्षेच्या किंवा अन्य कार्यवाहीच्या कामासाठी समक्ष हजर राहणाऱ्या कोणत्याही फिर्याददाराचा किंवा साक्षीदाराचा वाजवी खर्च शासनाकडून देववण्याचा आदेश देऊ शकेल.