भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३४९ :
व्यक्तीला नमूना सही किंवा हस्ताक्षर देण्यासाठी आदेश देण्याचा दंडाधिकाऱ्यांचा अधिकार :
या संहितेअन्वये कोणतेही अन्वेषण किंवा कार्यवाही करण्याच्या प्रयोजनासाठी कोणत्याही व्यक्तीला, तसेच आरोपी व्यक्तीला नमूना स्वाक्षरी किंवा हस्ताक्षराचा नमूना किंवा बोटांचे ठसे किंवा आवाजाचा नमुना देण्याचे निदेश देणे इष्ट आहे याबाबत एखाद्या दंडाधिकाऱ्याची खात्री झाली तर, तो तशा प्रकारचा आदेश देऊ शकेल आणि अशा प्रकरणात, तो आदेश ज्या व्यक्तीशी संबंधीत असेल तिला तिची नमूना सही किंवा हस्ताक्षर किंवा बोटांचे ठसे किंवा आवाजाचा नमुना देण्यासाठी त्या आदेशात विनिर्दिष्ट केलेल्या वेळी आणि ठिकाणी सादर करण्यात येईल किंवा ती उपस्थित राहील :
परंतु असे की, त्या व्यक्तीला असे अन्वेषण किंवा कार्यवाही याच्या संबंधात कधीतरी पकडण्यात आलेले असेल तर, या कलमान्वये कोणताही आदेश काढण्यात येणार नाही :
परंतु आणखी असे की, दंडाधिकारी, नोंद करण्याच्या कारणास्तव, इतर कोणत्याही व्यक्तीला अटक न करता असा नमुना किंवा सँपल पुरविण्याचे आदेश देऊ शकेल.