भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३२० :
आयोगपत्र कोणाला निदेशून काढावयाचे :
१) जेथे या संहितेचा विस्तार आहे त्या राज्यक्षेत्रात साक्षीदार असेल तर, ज्याच्या स्थानिक अधिकारितेत साक्षीदार सापडू शकेल, त्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यास निदेशून आयोगपत्र काढले जाईल.
२) साक्षीदार भारतात असला तरी, जर तो जेथे या संहितेचा विस्तार नाही अशा राज्यात किंवा क्षेत्रात असेल तर, आयोगपत्र हे केंद्र शासन अधिसूचनेद्वारे यासंबंधात विनिर्दिष्ट करील अशा न्यायालयास किंवा अधिकाऱ्यास निदेशून काढले जाईल.
३) जर साक्षीदार भारताबाहेरील एखाद्या देशात किंवा एखाद्या स्थळी असेल व केंद्र शासनाने अशा देशाच्या किंवा स्थळाच्या शासनाबरोबर फौजदारी बाबीसंबंधी साक्षीदारांची साक्ष घेण्याबाबत ठराव केला असेल तर, आयोगपत्र हे केंद्र शासन यासंबंधात अधिसूचनेद्वारे विहित करील त्याप्रमाणे तशा नमुन्यानुसार, तशा न्यायालयास किंवा अधिकाऱ्यास निदेशून काढले जाईल, आणि पुढे रवाना करण्यासाठी विहित अशा प्राधिकाऱ्याकडे पाठवण्यात येईल.