भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३१२ :
साक्षीच्या अभिलेखाची भाषा :
कलम ३१० किंवा कलम ३११ खाली जेथे उतरन घेतलेली असेल त्या प्रत्येक खटल्यात-
(a) क) (अ) जर साक्षीदाराने न्यायालयाच्या भाषेत साक्षीदाराने न्यायालयाच्या भाषेत साक्ष दिली तर, ती त्या भाषेत उतरून घेतली जाईल;
(b) ख) (ब) जर त्याने अन्य कोणत्याही भाषेत साक्ष दिली तर, जमल्यास ती त्या भाषेत उतरून घेतली जाईल व जर तसे करणे जमण्यासारखे नसेल तर, जसजशी साक्षीदाराची साक्षतपासणी होईल तसतसे न्यायालयाच्या भाषेत साक्षीचा यथार्थ अनुवाद तयार केला जाईल, दंडाधिकारी किंवा पीठासीन न्यायाधीश त्यावर स्वाक्षरी करील, व तो अभिलेखाचा भाग होईल;
(c) ग) (क) जेथे खंड (b)(ख) (ब)खाली न्यायालयाच्या भाषेहून अन्य भाषेत साक्ष उतरून घेतलेली असेल तेथे जमेल तितकया लवकर न्यायालयाच्या भाषेत तिचा यथार्थ अनुवाद तयार केला जाईल, दंडाधिकारी किंवा पीठासीन न्यायाधीश त्यावर स्वाक्षरी करील आणि तो अभिलेखाचा भाग होईल;
परंतु, जेव्हा खंड (b)(ख) (ब)खाली साक्ष इंग्रजीमध्ये उतरून घेतली असेल व पक्षकारांपैकी कोणीही न्यायालयाच्या भाषेत तिचा अनुवाद केला जाण्याची मागणी केली नसेल तेव्हा, न्यायालयाला अशा अनुवादाशिवाय चालवून घेता येईल.