भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण २४ :
कारागृहात बंदिवान किंवा स्थानबद्ध केलेल्या व्यक्तिची समक्ष हजेरी :
कलम ३०१ :
व्याख्या :
या प्रकरणात-
(a) क) (अ) स्थानबध्द या संज्ञेत, प्रतिबंधक स्थानबध्दतेचा उपबंध करणाऱ्या कोणत्याही कायद्याखाली स्थानबध्द केलेल्या व्यक्तीचा समावेश आहे;
(b) ख) (ब) कारागृह यामध्ये –
एक) राज्य शासनाने सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे दुय्यम तुरूंग म्हणून जाहीर केलेले असे कोणतेही स्थळ;
दोन) कोणतेही सुधारालय, बोस्र्टल संस्था किंवा तशाच स्वरूपाची संस्था, यांचा समावेश आहे.