Bnss कलम २९ : न्यायाधीशांचे व दंडाधिकाऱ्यांचे अधिकार त्यांच्या पदीय उत्तराधिकाऱ्यांना वापरता येणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २९ :
न्यायाधीशांचे व दंडाधिकाऱ्यांचे अधिकार त्यांच्या पदीय उत्तराधिकाऱ्यांना वापरता येणे :
१) या संहितेतील अन्य उपबंधांच्या अधीनतेने न्यायाधीशाचे किंवा दंडाधिकाऱ्याचे अधिकार व कामे त्याच्या पदीय उत्तराधिकाऱ्याला वापरता वा करता येतील.
२) कोणत्याही न्यायाधीशाचा पदीय उत्तराधिकारी कोण आहे याबाबत जेव्हा कोणतीही शंका असेल तेव्हा, कोणता न्यायाधीश या संहितेच्या अथवा ती खालील कोणत्याही कार्यवाहीच्या किंवा आदेशाच्या प्रयोजनार्थ अशा न्यायाधीशाचा पदीय उत्तराधिकारी म्हणून मानला जाईल ते सत्र न्यायाधीश लेखी आदेशाव्दारे निर्धारित करील.
३) कोणत्याही दंडाधिकाऱ्याचा पदीय उत्तराधिकारी कोण आहे याबाबत जेव्हा कोणतीही शंका असेल तेव्हा, कोणता दंडाधिकारी या संहितेच्या अथवा ती खालील कोणत्याही कार्यवाहीच्या किंवा आदेशाच्या प्रयोजनार्थ अशा दंडाधिकाऱ्याचा पदीय उत्तराधिकारी म्हणून मानला जाईल. ते, मुख्य न्यायदंडाधिकारी किंवा, प्रकरणपरत्वे, जिल्हा दंडाधिकारी लेखी आदेशाव्दारे निर्धारित करील.

Leave a Reply