Bnss कलम २७ : नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २७ :
नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांचे अधिकार :
शासनाच्या सेवेतील एखादे पद धारण करणाऱ्या ज्या व्यक्तीच्या ठायी उच्च न्यायालयाने किंवा राज्य शासनाने या संहितेखाली कोणत्याही संपूर्ण स्थानिक क्षेत्रापुरते कोणतेही अधिकार विनिहित केले असतील ती व्यक्ती त्याच राज्य शासनाच्या अखत्याराखालील सदृश स्थानिक क्षेत्रात, त्याच स्वरूपाच्या समतुल्य किंवा त्याहून वरिष्ठ पदावर नियुक्त केली जाईल तेव्हा तेव्हा ती व्यक्ती, उच्च न्यायालयाने किंवा, प्रकरणपरत्वे, राज्य शासनाने अन्यथा निदेशित केले नाही तर किंवा केलेले नसेल तर, जेथे ती याप्रमाणे नियुक्त केली गेली असेल त्या स्थानिक क्षेत्रात तेच अधिकार वापरील.

Leave a Reply