भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २७८ :
दोषमुक्ती किंवा दोषसिध्दी :
१) कलम २७७ मध्ये निर्दिष्ट केलेला साक्षीपुरावा आणि दंडाधिकारी स्वत: होऊन हजर करावयास लावील असा आणखी कोणताही साक्षीपुरावा असल्यास तो घेतल्यावर जर दंडाधिकाऱ्यास आरोपी अपराधी नाही असे आढळून आले तर, तो दोषमुक्तीचा आदेश नमूद करील.
२) जेव्हा दंडाधिकारी कलम ३६४ किंवा कलम ४०१ च्या उपबंधानुसार कार्यवाही करणार नाही तेव्हा, आरोपी अपराधी असल्याचे त्यास आढळून आले तर, तो त्याला कायद्यानुसार शिक्षा ठोठावील.
३) कलम २७५ किंवा २७८ खाली दंडाधिकारी या प्रकरणाखाली संपरीक्षायोग्य असलेला जो कोणताही अपराध आरोपीने केला आहे असे कबूल करण्यात आलेल्या किंवा शाबीत झालेल्या तथ्यांवरून दिसत असेल त्या अपराधाबद्दल आरोपीला त्यावरून सिध्ददोष ठरवणे त्याला बाधक होणार नाही अशी दंडाधिकाऱ्याची खात्री झाली तर मग फिर्यादीचे किंवा समन्सचे स्वरूप काहीही असले तरी तो आरोपीला सिध्ददोष ठरवू शकेल.