भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
(C) ग) (क) – संपरीक्षेचा निष्कर्ष :
कलम २७१ :
दोषमुक्ती किंवा दोषसिध्दी :
१) या प्रकरणाखालील ज्या कोणत्याही खटल्यात दोषारोपांची मांडणी केलेली असेल यात जर दंडाधिकाऱ्यास आरोपी अपराधी असल्याचे आढळून आले तर, तो दोषमुक्तीचा आदेश नमूद करील.
२) या प्रकरणाखालील कोणत्याही खटल्यात जेव्हा दंडाधिकाऱ्यास आरोपी अपराधी असल्याचे आढळून येईल, पण तो कलम ३६४ किंवा ४०१ च्या उपबंधानुसार कार्यवाही करणार नाही त्या बाबतीत, शिक्षेच्या प्रश्नाबाबत आरोपीचे म्हणणे ऐकल्यानंतर दंडाधिकारी कायद्यानुसार त्याला शिक्षा ठोठावील.
३) या प्रकरणाखालील कोणत्याही खटल्यात जेव्हा कलम २३४ पोटकलम (७) च्या खाली उपबंधाखाली पूर्वीच्या दोषसिध्दीचा आरोप केलेला असेल आणि दोषारोपात अभिकथन केल्याप्रमाणे आपणास पूर्वी सिध्ददोष ठरवण्यात आले होते. हे आरोपी कबूल करत नसेल त्या बाबतीत, उक्त आरोपीला सिध्ददोष ठरल्यानंतर दंडाधिकाऱ्याला अभिकथित पूर्व दोषसिध्दीबाबत साक्षी पुरावा घेता येईल, आणि तो त्यावरील निष्कर्ष नमूद करील:
परंतु, पोटकलम (२) खाली आरोपीला सिध्ददोष ठरवल्याशिवाय दंडाधिकरी असा कोणताही आरोप वाचून दाखविणार नाही किंवा आरोपीला त्याबाबत उत्तर देण्यास सांगितले जाणार नाही अथवा फिर्यादी पक्षाला किंवा त्याने दाखल केलेल्या साक्षी पुराव्यात पूर्वीच्या दोषसिध्दीचा निर्देश करता येणार नाही.