Bnss कलम २४० : दोषारोपात फेरबदल केला तर साक्षीदार पुन्हा बोलाविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २४० :
दोषारोपात फेरबदल केला तर साक्षीदार पुन्हा बोलाविणे :
संपरीक्षा सुरू झाल्यानंतर जेव्हाकेव्हा न्यायालयाने दोषारोपात फेरबदल केला असेल किंवा अधिक भर घातली असेल तेव्हा, फिर्यादीला किंवा आरोपीला:-
(a) क) (अ) ज्याची साक्षतपासणी केलेली असेल अशा कोणत्याही साक्षीदारास पुन्हा बोलवण्याची किंवा पुन्हा समन्स पाठवण्याची मुभा दिली जाईल- मात्र त्रास देण्याच्या किंवा विलंब लावण्याच्या किंवा न्यायाची उद्दिष्टे विफल करण्याच्या हेतूने, फिर्याही किंवा, प्रकरणपरत्वे, आरोपी हा अशा साक्षीदाराला पुन्हा बोलावू इच्छीत आहे किंवा त्याची पुन्हा साक्षतपासणी करू इच्छीत आहे या कारणास्तव मुभा नाकारावी असे न्यायालयाला वाटले तर, ती कारणे त्याला लेखी नमूद करावी लागतील;
(b) ख) (ब) त्याचप्रमाणे, न्यायालयाला महत्त्वाचा वाटेल अशा आणखी कोणत्याही साक्षीदाराला बोलवण्याची मुभा दिली जाईल.

Leave a Reply