Bnss कलम २२६ : फिर्याद काढून टाकणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २२६ :
फिर्याद काढून टाकणे :
जर फिर्याददार व साक्षीदार यांनी शपथेवर दिलेल्या जबान्या (असल्यास) आणि कलम २२५ खालील चौकशीतून किंवा तपासणीतून जे काही निष्पन्न झाले (असल्यास) ते विचारात घेतल्यानंतर जर पुढील कार्यवाही करण्यास पुरेसे कारण नाही असे दंडाधिकाऱ्याचे मत झाले तर, तो फिर्याद काढून टाकील, आणि अशा प्रत्येक बाबतीत, तो तसे करण्यामागची आपली कारणे थोडक्यात नमूद करील.

Leave a Reply