भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण १६ :
दंडाधिकाऱ्याकडे फिर्यादी :
कलम २२३ :
फिर्यादीची साक्ष तपासणी :
१) अधिकारक्षेत्र असलेला दंडाधिकारी जेव्हा फिर्यादीवरून अपराधाची दखल घेतो तेव्हा तो फिर्याददाराची आणि कोणी साक्षीदार उपस्थित असल्यास त्यांची शपथेवर साक्षतपासणी करील आणि अशा साक्षतपासणीचा सारांश लेखनिविष्ट करण्यात येईल आणि फिर्याददार व साक्षीदार आणि दंडाधिकारी ही तो स्वाक्षरित करतील :
परंतु, अभियुक्ताला (आरोपीला) सुनावणीची संधी दिल्याशिवाय कोणत्याही अपराधाची दखल दंडाधिकाऱ्यांकडून घेतली जाणार नाही :
परंतु, फिर्याद लेखी देण्यात आली असेल तेव्हा –
(a) क) (अ) जर आपली पदीय कामे पार पाडणाऱ्या किंवा तसे म्हणून कार्य करणाऱ्या लोकसेवकाने किंवा न्यायालयाने फिर्याद दिली असेल तर; किंवा
(b) ख) (ब) जर दंडाधिकाऱ्याने ते प्रकरण चौकशीसाठी किंवा संपरीक्षेसाठी कलम २१२ खाली अन्य दंडाधिकाऱ्याकडे सोपवले तर,
दंडाधिकाऱ्याने फिर्याददाराची व साक्षीदारांची साक्षतपासणी करण्याची गरज नाही.
परंतु आणखी असे की, जर दंडाधिकाऱ्याने फिर्याददाराची व साक्षीदारांची साक्षतपासणी केल्यानंतर कलम २१२ खाली अन्य दंडाधिकाऱ्याकडे ते प्रकरण सोपवले तर, त्या दुसऱ्या दंडाधिकाऱ्याने त्यांची फफेरतपासणी घेण्याची गरज नाही.
२) कोणताही दंडाधिकारी, शासकीय कार्ये किंवा कर्तव्ये पार पाडताना लोकसेवकाविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपराधासाठी तक्रारीची दखल घेणार नाही, तोपर्यंत-
(a) क) (अ) अशा लोकसेवकाला कथित घटना ज्या परिस्थितीमुळे घडली ते स्पष्ट करण्याची संधी दिली जात नाही; आणि
(b) ख) (ब) अशा लोकसेवकाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून घटनेची वस्तुस्थिती आणि परिस्थिती यांचा अहवाल प्राप्त होत नाही.