Bnss कलम २१ : कोणत्या न्यायालयांनी अपराधांची चौकशी करणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण ३ :
न्यायालयांचा अधिकार :
कलम २१ :
कोणत्या न्यायालयांनी अपराधांची चौकशी करणे :
या संहितेतील अन्य उपबंधांच्या अधीनतेने,-
(a) क) (अ) भारतीय न्याय संहिता २०२३ या खालील कोणत्याही अपराधाची संपरीक्षा-
एक)उच्च न्यायालय, किंवा
दोन)सत्र न्यायालय, किंवा
तीन) ज्याने अशा अपराधाची संपरीक्षा करावयाची असे पहिल्या अनुसूचीत दाखविण्यात आले असेल असे अन्य कोणतेही न्यायालय करू शकेल :
परंतु,भारतीय न्याया संहिता २०२३ याच्या कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ६९, कलम ७० किंवा कलम ७१ खालील कोणत्याही अपराधाची संपरीक्षा, व्ययहार्य असेल, तेथवर, महिला पीठासीन असलेल्या एखाद्या न्यायालयाव्दारे करण्यात येईल.
(b) ख) (ब) अन्य कोणत्याही कायद्याखालील कोणत्याही अपराधाची संपरीक्षा, जेव्हा यासंबंधात अशा कायद्यात कोणतेही न्यायालय उल्लेखिलेले असेल तेव्हा, असे न्यायालय करील आणि जेव्हा कोणतेही न्यायालय उल्लेखिलेले नसेल तेव्हा, त्याची संपरीक्षा-
एक) उच्च न्यायालय, किंवा
दोन) ज्याने अशा अपराधाची संपरीक्षा करावयाची असे पहिल्या अनुसुचीत दाखविण्यात आले असेल असे कोणतेही न्यायालय करू शकेल.

Leave a Reply