भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २११ :
आरोपीच्या अर्जा वरुन वर्ग करणे :
कलम २१० च्या पोटकलम (१) च्या खंड (ग) खाली दंडाधिकारी अपराधाची दखल घेईल तेव्हा, कोणताही साक्षीपुरावा घेण्याआधी आरोपीला असे कळवले जाईल की, त्या प्रकरणाची चौकशी किंवा संपरीक्षा अन्य दंडादिकाऱ्याकडून करून घेण्यास तो हक्कदार आहे, आणि आरोपीने किंवा, एकाहून अधिक आरोपी असल्यास त्यांपैकी कोणीही दखल घेणाऱ्या दंडाधिकाऱ्यासमोर पुढील कार्यवाही केली जाण्यास हरकत घेतली तर, ते प्रकरण मुख्य न्याय दंडाधिकारी यासंबंधात विनिर्दिष्ट करील अशा अन्य दंडांधिकाऱ्याकडे वर्ग केले जाईल.