भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण १४ :
कार्यवाही सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या शर्ती :
कलम २१० :
दंडाधिकाऱ्यांनी अपराधांची दखल घेणे :
१) या प्रकरणाच्या उपबंधांच्या अधीनतेने, कोणत्याही प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याला आणि पोटकलम (२) खाली यासंबंधात खास अधिकार प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही द्वितीय वर्ग दंडाधिकाऱ्याला एखाद्या अपराधाबाबत,-
(a) क) (अ) कोणत्याही विशेष कायद्यांतर्गत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या तक्रारीसह, अशा अपराधाला जी घटकभूत असतील अशा तथ्यासंबंधी फिर्याद आल्यावरून;
(b) ख) (ब) अशा तथ्यांबद्दलच्या पोलीस अहवालावरून (इलैक्ट्रॉनिक पद्धती सहित कोणत्याही पद्धतीत प्रस्तुत);
(c) ग) (क) असा अपराध घडला आहे अशी पोलीस अधिकाऱ्याहून अन्य कोणत्याही व्यक्तीकडून वदी मिळाल्यावरून किंवा स्वत:च्या माहितीवरून, दखल घेता येईल.
२) मुख्य न्याय दंडाधिकारी, ज्यांची चौकशी किंवा संपरीक्षा करणे हे त्याच्या अधिकारकक्षेत येते अशा अपराधांची पोटकलम (१) खाली दखल घेण्यास कोणत्याही द्वितीय वर्ग दंडाधिधकाऱ्याला शक्ती प्रदान करु शकेल.