Bnss कलम २०६ : शंका असल्यास कोणत्या जिल्ह्यात चौकशी करणे हे उच्च न्यायालयाने ठरविणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २०६ :
शंका असल्यास कोणत्या जिल्ह्यात चौकशी करणे हे उच्च न्यायालयाने ठरविणे :
जेव्हा दोन किंवा अधिक न्यायालयांनी त्याच अपराधाची दखल घेतलेली असेल आणि त्यांच्यापैकी कोणी त्या अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा करावयास हवी असा प्रश्न उद्भवला असेल तेव्हा,-
(a) क) (अ) जर ती न्यायालये एकाच उच्च न्यायालयाला दुय्यम असतील तर, ते उच्च न्यायालय;
(b) ख) (ब) जर ती न्यायालये एकाच उच्च न्यायालयाला दुय्यम नसतील तर, ज्याच्या अपीलीय फौजदारी अधिकारितीच्या स्थानिक मर्यादांच्या आत प्रथम ती कार्यवाही सुरू झाल ते उच्च न्यायालय, त्या प्रश्नाचा निर्णय करील व तदनंतर त्या अपराधाबाबतची अन्य सर्व कार्यवाही थांबवण्यात येईल.

Leave a Reply