Bnss कलम १८९ : अपुरा पुरावा असेल तेव्हा आरोपीस सोडून देणे :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १८९ :
अपुरा पुरावा असेल तेव्हा आरोपीस सोडून देणे :
जर आरोपीला दंडाधिकाऱ्याकडे पाठविणे समर्थनीय होण्याइतपत पुरेसा पुरावा किंवा संशयास वाजवी आधार नाही असे या प्रकरणाखालील अन्वेषणान्ती पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याला दिसून आले तर, अशी व्यक्ती हवालतीत असल्यास पोलीस अहवालावरून अपराधाची दखल घेण्याचा व आरोपीची संपरीक्षा करण्याचा किंवा त्याला संपरीक्षेसाठी सुपूर्द करण्याचा अधिकार प्रदान झालेल्या दंडाधिकाऱ्यासमोर त्या व्यक्तीने, तिला तसे फर्माविण्यात आल्यास व येईल तेव्हा उपस्थित होण्याबाबत असे बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित केल्यावर असा अधिकारी तिला बंधमुक्त करील.

Leave a Reply