Bnss कलम १८२ : कोणतेही प्रलोभन दाखवावयाचे नाही :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १८२ :
कोणतेही प्रलोभन दाखवावयाचे नाही :
१) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा अन्य प्राधिकारी व्यक्तीने स्वत: किंवा दुसऱ्याकरवी, भारतीय साक्ष्य अधिनियम, २०२३ याच्या कलम २२ मध्ये उल्लेखिलेले असे कोणतेही प्रलोभन दाखवता कामा नये अथवा तशी धमकी किंवा तसे वचन देता कामा नये.
२) या प्रकरणाखालील अन्वेषणाच्या ओघात कोणत्याही व्यक्तीला जो कोणताही जबाब स्वेच्छेने द्यावासा वाटेल तो देण्यास तिला कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा अन्य व्यक्तीने कोणताही इषारा देऊन किंवा अन्य प्रकारे प्रतिबंध करता कामा नये:
परंतु, या पोटकलमातील कोणतीही गोष्ट कलम १८३ च्या पोटकलम (४) च्या उपबंधांवर परिणाम करणार नाही.

Leave a Reply