Bnss कलम १७ : कार्यकारी दंडाधिकाऱ्याची दुय्यमता :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १७ :
कार्यकारी दंडाधिकाऱ्याची दुय्यमता :
१) सर्व कार्यकारी दंडाधिकारी हे जिल्हा दंडाधिकाऱ्याला दुय्यम असतील आणि उप- विभागात अधिकार वापरणारा (उप-विभागीय दंडाधिकाऱ्याहून अन्य ) प्रत्येक कार्यकारी दंडाधिकारी उप- विभागीय दंडाधिकाऱ्यालाही, पण जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या सर्वसाधारण नियंत्रणाच्या अधीनतेने, दुय्यम असेल.
२) जिल्हा दंडाधिकारी, आपणास दुय्यम असणाऱ्या कार्यकारी दंडाधिकाऱ्यांमध्ये कामकाज वाटून देणे आणि कामकाज नेमून देणे याबाबत वेळोवेळी या संहितेशी सुसंगत असे नियम करू शकेल किंवा विशेष आदेश देऊ शकेल.

Leave a Reply