भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १७७ :
अहवाल कसा सादर करावयाचा :
१) कलम १७६ खाली दंडाधिकाऱ्याकडे पाठविलेला प्रत्येक अहवाल, राज्य शासनाने तसा निदेश दिल्यास, त्या संबंधात राज्य शासन सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाव्दारे नियुक्त करील अशा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यापर्यंत सादर करण्यात येईल.
२) असा वरिष्ठ अधिकारी त्यास योग्य वाटतील असे अनुदेश पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्यास देऊ शकेल आणि अशा अहवालावर असे अनुदेश नमूद केल्यानंतर तो अहवाल दंडाधिकाऱ्याकडे विनाविलंब पाठवील.