Bnss कलम १७३ : दखलपात्र प्रकरणातील वर्दी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण १३ :
पोलिसांना वर्दी देणे आणि अन्वेषण करण्याचे त्यांचे अधिकार :
कलम १७३ :
दखलपात्र प्रकरणातील वर्दी :
१) दखलपात्र गुन्ह्याशी संबंधित प्रत्येक माहिती, गुन्हा ज्या भागात केला आहे त्या क्षेत्राचा विचार केल्याशिवाय, तोंडी किंवा इलैक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे दिली जाऊ शकेल आणि जर पोलीस स्टेशनच्या प्रभारी (अंमलदार) अधिकाऱ्याला तोंडी माहिती दिली असेल तर,-
एक) तो ती लेखनिविष्ट करील किंवा आपल्या सांगण्यावरून करवून घेईल, आणि वर्दीदाराला ती वाचून दाखवण्यात येईल; आणि अशा प्रत्येक वर्दीखाली-मग ती लेखी दिलेली असो वा पूर्वोक्तानुसार लेखनिविष्ट करण्यात आलेली असो- ती देणाऱ्या व्यक्तीला स्वाक्षरी करावी लागेल;
दोन) जर माहिती इलैक्ट्रॉनिक संप्रेषणा द्वारा दिली असेल तर, तर माहिती देणाऱ्या व्यक्ती द्वारा तीन दिवसांमध्ये हस्ताक्षरित केल्यानंतर त्याच्या द्वारा लेखनिविष्ट केली जाईल,
आणि तिच्या गोषवाऱ्याची नोंद राज्य शासन यासंबंधात नियमांद्वारे विहित करील अशा नमुन्यानुसार अशा अधिकाऱ्याने ठेवावयाच्या पुस्तकात केली जाईल :
परंतु असे की, भारतीय न्याय संहिता २०२३ याचे कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ६९, कलम ७०, कलम ७१, कलम ७४, कलम ७५, कलम ७६, कलम ७७, कलम ७८, कलम ७९ किंवा कलम १२४ खालील अपराध किंवा अपराधाचा प्रयत्न जिच्या बाबतीत करण्यात आला असल्याचे कथित असेल अशा स्त्रीने वर्दी दिली असेल तर अशी वर्दी महिला पोलीस अधिकाऱ्याने किंवा अन्य महिला अधिकाऱ्याने लेखनिविष्ट केली पाहिजे :
परंतु आणखी असे की,-
(a) क) (अ) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ६९, कलम ७०, कलम ७१, कलम ७४, कलम ७५, कलम ७६, कलम ७७, कलम ७८, कलम ७९ किंवा कलम १२४ खालील अपराध किंवा अपराधाचा प्रयत्न जिच्या बाबतीत करण्यात आला असल्याचे कथित असेल अशी व्यक्ती तात्पुरती किंवा कायमस्वरूपी मानसिक किंवा शारीरिकदृष्टया अपंग असेल तर, पोलीस अधिकारी, ज्या व्यक्तीने अशा अपराधाची वर्दी द्यावयाची असेल तिच्या निवासस्थानी किंवा अशा व्यक्तीच्या पसंतीच्या सोयीस्कर ठिकाणी, दुभाष्याच्या किंवा यथास्थिती, विशेष शिक्षण देणाऱ्याच्या उपस्थितीत ती वर्दी लेखनिविष्ट करण्यात येईल;
(b) ख) (ब) अशा वर्दीचे दृक्श्राव्य चित्रण (वीडियोग्राफ)घेण्यात येईल;
(c) ग) (क) दंडाधिकाऱ्याने, कलम १८३, याच्या पोटकलम (६) चा खंड (क) (a)अन्वये नोंदवलेला त्या व्यक्तीचा जबाब पोलीस अधिकारी शक्य तितक्या लवकर मिळवील.
२) पोटकलम (१) खाली जशी नोंदण्यात आली असेल तशा वर्दीची एक प्रत वर्दीदाराला आणि पीडिताला तत्काळ विनाशुल्क देण्यात येईल.
३) कलम १७५ मध्ये अंतर्विष्ट असलेल्या तरतुदींना बाध न येता, तीन वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा असलेल्या परंतु सात वर्षोपेक्षा जास्त नसलेल्या शिक्षा असलेल्या कोणत्याही दखलपात्र गुन्ह्यासंबंधीची माहिती मिळाल्यावर, पोलिस स्टेशनचा प्रभारी अधिकारी (अंमलदार अधिकारी) :-
एक) चौदा दिवसांच्या कालावधीत या प्रकरणात कार्यवाही करण्यासाठी प्रथमदर्शअनी प्रकरण अस्तित्वात आहे की नाही हे तपासण्यासाठी प्राथमिक चौकशी करण्यासाठी; किंवा
दोन) तपासाची कार्यवाही करण्यासाठी प्रथमदर्शनी खटला अस्तित्वात असताना, तो पोलीस उपअधीक्षक पदापेक्षा कमी नसेल अशा अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने अशा गुन्ह्यांचे स्वरुप आणि गांभीर्य लक्षात घेईल.
४) पोटकलम (१) मध्ये विनिर्दिष्ट केलेली वर्दी नोंदून घेण्यास पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याने नकार दिल्यामुळे नाराज कोणत्याही व्यक्तीस लेखी स्वरूपात आणि डाकेने अशा वर्दीचा गोषवारा संबंधित पोलीस अधीक्षकाकडे पाठविता येईल, आणि दखलपात्र अपराध घडला असल्याचे अशा वर्दीवरून उघडकीस आले आहे अशी जर त्याची खात्री झाली तर, या संहितेव्दारे उपबंधित केलेल्या रीतीने त्या प्रकरणी एकतर तो स्वत: अन्वेषण करील किंवा त्यास दुय्यम असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकरवी अन्वेषण करवण्याचा निदेश देईल, आणि अशा अधिकाऱ्याला त्या अपराधाच्या संबंधात पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याचे सर्व अधिकार असतील, जर ते पूर्ण न केल्यास तो दंडाधिकाऱ्याकडे अर्ज करु शकेल.

Leave a Reply