भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १६ :
कार्यकारी दंडाधिकारी यांची अधिकारिता :
१) राज्य शासनाच्या नियंत्रणाच्या अधीनतेने, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना या संहितेखाली त्यांच्या ठायी विनिहित केले जातील ते सर्व किंवा त्यांपैकी कोणतेही अधिकार ज्या क्षेत्रांत वापरता येतील त्यांच्या स्थानिक सीमा वेळोवेळी जिल्हा दंडाधिकाऱ्याला निश्चित करता येतील.
२) अशा निश्चितीव्दारे अन्यथा उपबंधित केले असेल ते खेरीजकरून एरव्ही, अशा प्रत्येक दंडाधिकाऱ्याच्या अधिकारितेचा आणि अधिकारांचा जिल्ह्यात सर्वत्र विस्तार असेल.