Bnss कलम १५ : विशेष कार्यकारी दंडाधिकारी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १५ :
विशेष कार्यकारी दंडाधिकारी :
राज्य शासन, त्याला योग्य वाटेल अशा मुदतीकरता, विशेष कार्यकारी दंडाधिकारी किंवा कोणताही पोलीस अधिकारी जो पोलीस अधीक्षकाच्या दर्जाच्या खाली नसलेला किंवा समकक्ष दर्जाचा, म्हणून ओळखण्यात यावयाचे असे कार्यकारी दंडाधिकारी विशिष्ट क्षेत्रांकरता किंवा विशिष्ट कार्ये करण्याकरता, नियुक्त करू शकेल आणि ते या संहितेखाली कार्यकारी दंडाधिकऱ्याला जे अधिकार प्रदान करण्याजोगे आहेत, त्यांपैकी आपणांस योग्य वाटतील असे अधिकार अशा विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना प्रदान करू शकेल.

Leave a Reply