भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १५३ :
आदेशाची बजावणी अगर अधिसूचना :
१) तो आदेश, तसे करणे शक्य असल्यास, ज्या व्यक्तीविरूध्द तो देण्यात आला तिच्यावर, समन्सच्या बजावणीकरता यात उपबंधित केलेल्या रीतीने बजावता जाईल.
२) असा आदेश याप्रमाणे बजावणे शक्य नसल्यास तो, राज्य शासन नियमांव्दारे निदेशित करील अशा रीतीने प्रकाशित केलेल्या उद्घोषणेव्दारे अधिसूचित केला जाईल, आणि अशा व्यक्तीला माहिती कळवण्यासाठी सर्वांत योग्य असेल अशा एखाद्या स्थळी किंवा अनेक स्थळी त्याची एकेक प्रत चिकटविली जाईल.