Bnss कलम १३४ : वैयक्तिक हजर रहाण्यापासून अभिमुक्ती (सोडने / रहित किंवा स्वत: हजर रहाणे आवश्यक नसते) देण्याची शक्ति :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १३४ :
वैयक्तिक हजर रहाण्यापासून अभिमुक्ती (सोडने / रहित किंवा स्वत: हजर रहाणे आवश्यक नसते) देण्याची शक्ति :
ज्या व्यक्तीला, शांतता राखण्यासाठी किंवा चांगली वागणूक ठेवण्यासाठी बंधपत्र निष्पादित करण्याचा आदेश तिला का देऊ नये, याचे कारण दाखविण्यास फर्माविण्यात आले असेल अशा कोणत्याही व्यक्तीची जातीनिशी हजेरी अनावश्यक करण्यास दंडाधिकाऱ्याला पुरेसे कारण दिसल्यास तो तसे करू शकेल आणि तिला वकिलामार्फ त उपस्थित राहण्याची परवानगी देऊ शकेल.

Leave a Reply