भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १२७ :
प्रजाक्षोभक (राजद्रोहात्मक) साहित्य प्रसृत करणाऱ्या व्यक्तीकडून चांगल्या वर्तनाचा जामीन :
१) जेव्हा एखाद्या कार्यकारी दंडाधिकाऱ्याला, त्याच्या स्थानिक अधिकारितेत किंवा त्याबाहेर असताना जी व्यक्ती,-
एक) (a) (क) (अ) भारतीय न्याय संहिता २०२३ यातील कलम १५२ किंवा कलम १९६ किंवा कलम १९७ किंवा २९९ याखाली ज्याचे प्रकाशन शिक्षापत्र आहे असे कोणतेही साहित्य, किंवा
(b) ख) (ब) जे साहित्य प्रसृत करणे हे भारतीय न्याय संहिता २०२३ याखाली फौजदारीपात्र धाकदपटशा किंवा बदनामी या सदरात जमा होते असे, आपली पदीय कर्तव्ये पार पाडण्याचे कार्य करणाऱ्या किंवा तसे म्हणून कार्य करणाऱ्या न्यायाधीशासंबंधीचे कोणतेही साहित्य,
तोंडी किंवा लेखी किंवा अन्य कोणत्याही रीतीने प्रसृत करते किंवा पसृत करण्याचा प्रयत्न करते किंवा ते पसृत करण्यास अपप्रेरणा देते,
दोन) भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम २९४ मध्ये निर्दिष्ट केलेले असे कोणतेही अश्लील साहित्य बनवते, निर्माण करते, प्रकाशित करते किंवा विक्रीस ठेवते, आयात करते, निर्यात करते, अभिहस्तांतरित करते, विकते, भाडयाने देते, वितरित करते, जाहीररीत्या प्रदर्शित करते किंवा अन्य कोणत्याही रीतीने त्याचा प्रसार करते,
अशी एखादी व्यक्ती आपल्या स्थानिक अधिकारितेत आहे अशी खबर मिळालेली असेल आणि पुढील कार्यवाही करण्यास पुरेसे कारण आहे असे त्या दंडाधिकाऱ्याचे मत असेल तेव्हा, यात यापुढे उपबंधित केलेल्या रीतीने तो दंडाधिकारी, त्यास योग्य वाटेल त्याप्रमाणे जास्तीत जास्त एक वर्षाच्या कालावधीपुरते अशा व्यक्तीने चांगली वागणूक ठेवण्यासाठी, बंधपत्र किंवा जामीनपत्र निष्पादित करण्याचा आदेश तिला का देऊ नये याचे कारण दाखवण्यास त्या व्यक्तीला फर्मावू शकेल.
२) प्रेस आणि पुस्तक नोंदणी कायदा १८६७ (१८६७ चा २५) यामध्ये घालून दिलेल्या नियमांखाली नोंदणी केलेल्या आणि त्यानुरूप संपादित, मुद्रित व प्रसिध्द केलेल्या कोणत्याही प्रकाशनाचा संपादक, मालक, मुद्रक किंवा प्रकाशक याच्या विरूध्द अशा प्रकाशनात अंतर्भूत असलेल्या कोणत्याही साहित्याच्या संदर्भात या कलमाखाली कोणतीही कार्यवाही राज्य शासन किंवा राज्य शासनाने या संबंधात अधिकार प्रदान केलेला एखादा अधिकारी यांच्या आदेशाखेरीज किंवा प्राधिकाराखेरीज केली जाणार नाही.