भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ११६ :
बेकायदेशीरपणे मिळवलेली मिळकत ओळखणे :
१) कोर्ट वरील कलम ११५ च्या पोटकलम (१) अगर (३) प्रमाणे विनंतीपत्र मिळाल्यावर फौजदार दर्जाचे पोलीस अधिकाऱ्यास आदेश देतील की अशी मिळकत शोधून काढणे आणि पटविणे करता योग्य ती कारवाई सुरू करावी.
२) पोटकलम (१)मधील कारवाई याचा अर्थ चौकशी-तपास-पाहणी करणे आणि ती कोणत्याही व्यक्ती-जागा, दस्तऐवज, बँकपुस्तके, मिळकत, सार्वजनिक वित्तसंस्था आणि संबंधी लागू गोष्टींची करणे.
३) पोटकलम (२) मधील चौकशी वगैरे पोटकलम (१) मधील पोलीस अधिकारी कोर्टाच्या सूचनेप्रमाणे करतील.