भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ९५ :
अपराध घडवून आणण्यासाठी किंवा बालकांना भाड्याने मिळविणे, नियोजित करणे किंवा नियुक्त करणे :
कलम : ९५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही बालकाला अपराध घडवून आणण्यासाठी भाड्योन घेणे, नियोजित करणे किंवा नियुक्त करणे.
शिक्षा : कमीत कमी ३ वर्षाचा कारावास जो १० वर्षापर्यंत वाढविता येईल व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
अपराध : जर अपराध घडल्यास.
शिक्षा : घडलेल्या अपराधाला असेल त्याप्रमाणे.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : ते न्यायालय ज्याद्वारे घडलेला अपराध विचारणीय आहे.
———
जो कोणी, एखादा अपराध घडवून आणण्यासाठी बालकाला भाड्याने मिळविल, नियोजित करील किंवा नियुक्त करील तर त्याला तीन वर्षापेक्षा कमी नसेल परंतु दहा वर्षापर्यंत वाढू शकेल इतक्या मुदतीसांठी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल; आणि जर अपराध घडला असेल तर त्या अपराधासाठी उपबंधित दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रव्यदंडाची शिक्षा होईल जसे, असा अपराध त्या व्यक्तीने स्वत: केला आहे.
स्पष्टीकरण :
लैंगिक शोषण किंवा अश्लील साहित्यासाठी बालकाला भाड्याने मिळविणे, नियोजित करणे, नियुक्त करणे किंवा उपयोग करणे या कलमाच्या अर्था अंतर्गत आहे.