भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३१५ :
मृत व्यक्तीच्या मृत्यूसमयी तिच्या कब्जात असलेल्या मालमत्तेचा अप्रामाणिकपणाने अपहार :
कलम : ३१५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : अशी मालमत्ता अप्रामाणिकपणे अपराह करणे, जी मृत व्यक्तिच्या मृत्युच्या वेळी त्याच्यां कब्जात होती.
शिक्षा : ३ वर्षाचा कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
अपराध : जर मृत व्यक्ति द्वारा नियोजित लिपिक किंवा व्यक्ती द्वारा.
शिक्षा : सात वर्षाचा कारावास .
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
मृत व्यक्तीच्या कब्जात कोणतीही मालमत्ता तिच्या मृत्यूच्या वेळी होती आणि असा कब्जा घेण्यास विधित: हक्कदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कब्जात त्यानंतर ती नाही हे माहीत असून जो कोणी अशा मालमत्तेचा अप्रामाणिकपणाने अपहार करील, किंवा आपल्या उपयोगासाठी ती स्वत:ची म्हणून वापरील त्याला, तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल आणि जर अशा व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी, अपराधी हा कारकून किंवा चाकर म्हणून तिच्या नोकरीत असेल तर, कारावास सात वर्षांपर्यंत असू शकेल.
उदाहरण :
काही फर्निचर व पैसा असातान (य) चा मृत्यु होतो. (क) हा त्याचा चाकर असा कब्जा घेण्यास हक्कदार असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या कब्जामध्ये पैसा जाण्यापूर्वीच त्या पैशांचा अप्रामाणिकपणाने अपहार करतो. (क) ने या कलमामध्ये व्याख्या करण्यात आलेला अपराध केला आहे.