भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २७५ :
अपायकारक खाद्यपदार्थांची किंवा पेयाची विक्री:
कलम : २७५
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणताही खाद्य पदार्थ किंवा पेय ते अपायकारक असल्याचे माहीत असताना खाद्य पदार्थ किंवा पेय म्हणून त्याची विक्री करणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणताही पदार्थ अपायकारक करण्यात आला आहे किंवा झाला आहे अथवा खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी अयोग्य स्थितीत आहे तो पेय किंवा अन्न म्हणून अपायकारक आहे हे स्वत:ला माहीत असून किंवा तसे समजण्यास कारण असून जो कोणी तो पदार्थ अन्न किंवा पेय म्हणून विकेल किंवा विकत देऊ करील किंवा विक्रिसाठी मांडील, तर त्याला सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा पाच हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.